Tue. Oct 27th, 2020

मराठवाड्यात कृत्रीम पाऊस! शासनाची तयारी पुर्ण

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात कृत्रीम पाऊस पाडण्यात येणार आहे. मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने शासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. कृत्रीम पावसाची सर्व तयारी पुर्ण झाली आहे असं सांगण्यात आलं आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात कृत्रीम पाऊस पाडण्यात येणार आहे. मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने शासनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. कृत्रीम पावसाची सर्व तयारी पुर्ण झाली आहे असं सांगण्यात आलं आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खरीप हंगाम संकटात आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठवाड्यात कृत्रीम पाऊस!

राज्यात मान्सून दाखल होऊन दीड महिना होतोय मात्र अद्यापही मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने आज ही राज्यात 4 हजार टँकरने तर मराठवाड्यात 2 हजार टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

मराठवाड्यात पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. तसेच खरीप हंगाम संकटात आला असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कृत्रीम पाऊस पाडण्याची गरज भासत आहे.

या कारणास्तव शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलीय आहे. यामुळेच मराठवड्यातील शेतकऱ्यांची चिंतेत भर पडली आहे.

शासनाने कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी 30 कोटींची तरतूद केली असून मात्र शासकीय पातळीवर कृत्रीम पाऊस पाडण्यासाठी कासव गतीने हालचाली होताना दिसत आहेत.

कृत्रीम पावसाची शासनाची तयारी पुर्ण झाली असून 30 जुलैपर्यंत सरकार सर्व परवानग्या घेईल असं सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *