Mon. Dec 6th, 2021

अरविंद केजरीवाल यांच्या लगावली कानशिलात

दिल्ली येथे रोड शोदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.  अरविंद केजरीवाल आम आदमी पक्षाचे उमेदवार ब्रजेश गोयल यांचा प्रचार करत होते. केजरीवाल आपल्या समर्थकांना हात उंचावून अभिवादन करत असताना अचानक एका व्यक्तीने जीपवर चढून केजरीवाल यांच्या श्रीमुखात भडकावली.

हल्लेखोर केजरीवाल यांच्यावर नाराज होता, त्यातून त्याने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.  त्याच नाव सुरेश असून तो कैलाश पार्क भागात राहतो. या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलंय. त्याच्या या वागण्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी केली जात आहे.

केजरीवाल यांच्यावरील हल्ल्यामागे भाजपचंच षडयंत्र असल्याचा दावा ‘आप’चे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केलाय.

2014 सालीही दिल्लीत रोड शो दरम्यान केजरीवाल यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला होता.  एप्रिल 2014 मध्ये दिल्लीत एका ऑटो ड्राइवरने केजरीवाल यांना थप्पड लगावली होती. जानेवारी 2016 रोजी भावना अरोड़ा नावाच्या महिलेनं केजरीवाल यांच्यावर शाई फेकली होती.

केजरीवालांवर आत्तापर्यंत झालेले हल्ले 

२०१८ – दिल्ली सचिवालयात केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड फेकण्याचा प्रयत्न
२०१४- हैदराबाद शहरात केजरीवाल यांच्या गाडीवर दगडफेक
२०१४-वाराणसीमध्ये लोकसभा निवडणूकादरम्यान शाई आणि अंडी फेकून मारलेत
२०१४- हरियाणात अन्ना हजारे समर्थकाने  केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली
२०१३- केजरीवाल यांच्यावर अन्ना हजारे समर्थकाने शाई फेकली

२०११- लखनौला केजरीवाल यांच्यावर चप्पल फेकली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *