Sat. Aug 17th, 2019

जनकल्याणाऐवजी स्वत:च्या कल्याणाकडे लक्ष देत काळा पैसा पांढरा केला; केजरीवालांवर आणखी एक खळबळजनक आरोप

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आपचे निलंबित मंत्री कपिल मिश्रांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

 

अरविंद केजरीवालांनी जनकल्याणाऐवजी स्वत:च्या कल्याणाकडे लक्ष देत काळा पैसा पांढरा करण्याचासुद्धा प्रयत्न केल्याचासुद्धा आरोप त्यांनी केला.

 

दरम्यान पत्रकार परिषदेत बोलता बोलताच कपिल मिश्रांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

 

केजरीवाल सध्या कपिल मिश्रांच्या निशाण्यावर आहेत. जनतेची फसवणूक करणाऱ्या केजरीवालांविरोधात कपिल मिश्रा सोमवारी सीबीआयसमोर पुरावे सादर करणार आहेत.

 

केजरीवालांनी अनेक बोगस कंपन्यांकडून फंड जमवला. तसेच एका व्यक्तीकडून 1 कोटी 10 लाख रुपयांची देणगी घेतल्याचासुद्धा गौप्यस्फोट मिश्रांनी केला.  

 

अरविंद केजरीवाल यांना थोडी जरी लाज वाटत असेल तर त्यांनी आजच राजीनामा द्यावा, अन्यथा मी त्यांची कॉलर धरून त्यांना तिहार तुरुंगात टाकेन, असंही मिश्रांनी ठणकावले.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *