आर्यन खानला आजही दिलासा नाही

क्रूझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत आहे. याप्रकरणी आर्यनच्या जामीनावर आज सुनावणी होणार होती. आर्यनच्या ड्रग्जप्रकरणी आजही सुनावणी अपूर्ण राहिली असून उर्वरित सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळे आर्यनला आजही दिलासा मिळाला नसून त्याच्या अटकेत आता वाढ झाली आहे.
आर्यन वकिलासह अरबाज आणि मुनमुन यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद केला. ज्येष्ठ वकील मुकुल रोहतग यांनी आर्यनची बाजू न्यायालयात मांडली. तसेच महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी न्यायालयात एनसीबीची बाजू मांडली. आता आर्यनच्या जामिनावर सुनावणी पुडे ढकलली असून उद्या गुरुवार २.३० वा. सुनावणी होणार आहे.