Mumbai

२६ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीनावर सुनावणी

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे अधिकारी आर्यनसह संबंधित व्यक्तिंची कसून चौकशी करत आहेत. यातच आर्यनच्या जामीन अर्जाला तारीख पे तारीख मिळत होती. आणि आता उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामीन अर्जाची सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे. तसेच एनडीपीएस न्यायालयाने आर्यनसह इतर आरोपींच्या कोठडीत वाढ करत ३० ऑक्टोबरपर्यंत केली आहे.

आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्यापुढे जामीन अर्ज सादर करत या अर्जावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली. मात्र न्या. सांब्रे यांनी २६ ऑक्टोबर रोजी आर्यनची जामीन ठेवली आहे.

ड्रग्जप्रकरणी चौकशी दरम्यान आर्यनचे व्हॉट्सऍप चॅट तपासण्यात आले. या चॅटमध्ये आर्यनने ड्रगच्या व्यवहारासंबंधी चॅट केल्याचे उघड झाले. तसेच या चॅटमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेसोबत ड्रग्जविषयी बोलल्याचे आढळले. त्यामुळे आर्यनची जामीन पुढे ढकलण्यात आली आहे. आर्यनकडे क्रुझपार्टीदरम्यान ड्रग्ज आढळल्यामुळे तपासादरम्यान त्याला जामीन मिळणे योग्य नाही.

३ ऑक्टोबर रोजी आर्यनसह अरबाज, मुनमुन यांना अटक करण्यात आली. एनसीबी कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्या तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपांच्या वकिलांनी त्यांचा जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला. परंतु त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांची सुटका करण्यासही नकार दिला.

pawar sushmita

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

5 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

6 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

6 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

6 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

6 days ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

7 days ago