Mon. Aug 8th, 2022

पाकिस्तान नाराजच! कलम 370 हटवल्यानंतर पाकने केली हवाई हद्द बंद

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35ए हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पाकचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी दिली आहे. बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर आता पुन्हा पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतली आहे.

पाकिस्तान नाराज असल्यामुळे पाकच्या पंतप्रधानांचा निर्णय –

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 आणि कलम 35ए हटवल्यानंतर पाकिस्तान दुखावले असल्याचे म्हटलं जात आहे.

याकारणामुळे पाकिस्तानने हवाई हद्द  भारतासाठी बंद केल्याची माहिती पाकचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी दिली.

भारत आणइ अफगाणिस्तानमधील व्यापारासाठी वापरला जाणारा पाकिस्तानचा भूमार्गही पाकिस्तान रोखणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण झालेले नाही.

‘मोदींनी जे सुरू केले आहे. त्याचा शेवट आम्ही करणार’, असल्याचे फवाद चौधरी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

यापूर्वी पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये झालेल्या एअर स्ट्राईकमुळे पाकने हवाई हद्द बंद केले होते.

त्यानंतर १६ जून रोजी ही हद्द पुन्हा खुली करण्यात आली.

भारताबरोबरचा व्यापारही पाकिस्तानने थांबवला असून, दोन्ही देशांदरम्यानची बस व रेल्वेसेवाही स्थगित केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.