Jaimaharashtra news

हिंदुत्ववादी संघटनांवर ओवैसींचा हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

गोरक्षकांकडून देशभरात विविध ठिकाणी हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामागे हिंदुत्ववादी संघटनांचे नियोजन असल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष खासदार

असदुद्दीन ओवैसी यांनी केला.

 

औरंगाबादमध्ये ओवैसींच्या नेतृत्वात मौलाना आझाद चौक ते भडकल गेटपर्यंत खामोश मोर्चा काढण्यात आला होता.

 

मोर्चाच्या समारोपप्रसंगी त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. गेल्या तीन वर्षांत गोरक्षकांकडून 35 जणांच्या हत्या झाल्याचं सांगत हिंदुत्ववादी संघटनांवर ओवैसींनी

हल्लाबोल केला.

Exit mobile version