Sun. May 31st, 2020

आसारामला जन्मठेप! इतर दोघांना प्रत्येकी २० वर्षांचा तुरुंगवास

जय महाराष्ट्र न्युज 

अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणात दोषी ठरलेला अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात जोधपूरच्या विशेष न्यायालयाचे जज मधुसूदन शर्मा यांनी दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना प्रत्येकी २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले.

२०१३ मध्ये शाहजहांपूरच्या १६ वर्षाच्या मुलीने आसाराम याच्यावर जोधपूर आश्रममध्ये बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून आसाराम जेलमध्ये आहे. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी पोलिसांनी आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

आसारामविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत, जुवेनाईल जस्टिस अर्थात अल्पवयीन न्याय आणि आयपीसीच्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. केसच्या फॅक्ट्स, अनेक महिन्यांची सुनावणी आणि गुजराततेत दाखल गुन्ह्यांची पेंडिंग ट्रायलवरून आसारामला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *