स्मृती इराणींबद्दल आशा भोसले यांनी केले ‘हे’ ट्विट

लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेने एनडीएला भरघोस मतांनी निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडाळाने गुरुवारी मंत्रीपदासाठी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक करन जोहार, अभिनेता शाहीद कपूर, अभिनेत्री कंगना रणावतसह प्रख्यात गायिका आशा भोसले यांनीही उपस्थिती लावली होती. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतरचा एक फोटो आशा भोसले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला.
काय आहे ‘ती’ पोस्ट ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेतली.
यावेळी मोदींसह 58 मंत्र्यांनी शपथ घेतली.
शुक्रवारी म्हणजे आज मंत्रिमंडाळात खातेवाटपही करण्यात आले आहे.
अमित शाह यांना गृहमंत्री तरी निर्मला सीतारमन यांना अर्थमंत्री खाते देण्यात आले आहे.
तर स्मृती इराणी यांना पुन्हा महिला आणि बालकल्याण व वस्त्रोद्योग खाते देण्यात आले आहे.
शपथविधी सोहळा संपल्यानंतर राष्ट्रपती भवनात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
त्यामुळे अनेक दिग्गज मंडळींना बाहेर पडण्यात त्रास झाला.
यामध्ये प्रख्यात गायिका आशा भोसलेही अडकल्या होत्या.
त्यांना या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मदत केल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मला कोणीही या गर्दीतून बाहेर येण्यास मदत करत नव्हते. यावेळी स्मृती इराणी यांनी मला बाहेर काढण्यास मदत केली.
स्मृती इराणी यांनी चांगल्या प्रकारे काळजी घेतली म्हणूनच त्या विजयी झाल्या आहेत असेही पोस्टमध्ये शेअर केले आहे.