Mon. Sep 27th, 2021

आशिष शेलारांचं राज्य सरकारला प्रत्युत्तर

विरोधी पक्षांचे नेते, विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून लॉकडाउनला विरोध होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून पंतप्रधान मोदींनी लागू केलेल्या लॉकडाउनवरून प्रश्न उपस्थित केले होते. त्याला भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यात भाजपाकडून लॉकाडाउनला विरोध होत असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मोदींनी लागू केलेल्या लॉकडाउनचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. “एका वर्षापूर्वी जेव्हा करोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहित नव्हता. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जनसहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

“आज एका वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असं बरंच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच “हुशार” सत्ताधारी लॉकडाउन शिवाय पर्याय नाही, असं सांगतात. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही किंवा लॉकडाउनला विरोधही करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा!,” असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *