Tue. Jun 28th, 2022

भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं – अशोक चव्हाण

भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं, अशा शब्दात महाविकासआघाडीचे मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला टोला लगावला आहे.

तसेच महाविकासआघाडी सरकारचं काम उत्तम पद्धतीने सुरु आहे. हे महाविकासआघाडीचं सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अशोक चव्हाण माध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत.

भाजपने सरकार पाडण्याचे नसते उद्योग करण्यापेक्षा विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असा सल्ला देखील अशोक चव्हाण यांनी भाजपला दिला आहे.

तीनही पक्षाच्या सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. कोणत्याही प्रकारचे वादाचे मुद्दे येणार नाही, याची दक्षता आम्ही घेत आहोत.

एखादा विषय समोर आला, तर मतभिन्नता असू शकते. हे असे प्रश्न सोडवण्यासाठी समन्व्य समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

विरोधकांना अडचण निर्माण झालीय

विरोधकांना अडचण निर्माण झाली आहे. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर लोकांनी आपल्याला नाकारलं आहे. किंवा सत्ता स्थापन करु शकलो नाही, ही विरोधकांनी अडचण निर्माण झाली आहे.

बाहेर काय बोलावं यााबतीत भाजपमध्ये अंतर्गत द्विधा अवस्था आहे. चंद्रकांत पाटील एक बोलतात, फडणवीस एक बोलतात. भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं अशोक चव्हाण म्हणाले.

जनादेशाचा अपमान आहे, हुशार विद्यार्थ्याला बाहेर बसवलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

तसेच मध्यावधी निवडणुका होतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. याबाबतीत अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

कार्यकाळ पूर्ण करणार

महाविकास आघाडी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे महाविकास आघाडीला काही धोका नाही आहे.

तसेच भाजपने हे सरकार अस्थिर करणं, हे लोकं मान्य करणार नाही, असंही चव्हाण म्हणाले.

लोकांना भाजपचं सरकार नकोय

राज्यातील लोकांना भाजपचं सरकार नकोय, म्हणून तीनही पक्ष एकत्र आले असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.