Wed. Jun 26th, 2019

अशोक गहलोतच राजस्थानचे ‘पायलट’!

0Shares

नुकत्याच लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली असून अशोक गहलोत यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिन पायलट यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान सचिन पायलट यांची मुख्यमंत्री पदाच्या नावासाठी मोठी चर्चा होती मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री पदासोबत सचिन पायलट हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळणार आहेत.

राजस्थानात 2013 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने काँग्रेस सरकारचे पानिपत केले होते मात्र सचिन पायलट यांनी मोर्चेबांधणी करत पक्षसंघटन मजबूत केले आणि पुन्हा काँग्रेस चे सरकार राजस्थान मध्ये आले यामुळे राहुल गांधी नवीन चेहऱ्याला मुख्यमंत्रीपदासाठी संधी देणार का याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र काँग्रेसने अनुभवी आणि यापूर्वी मुख्यमंत्रीपद भूषवलेल्याअशोक गहलोत यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली.

अशोक गहलोत यांच्याविषयी-
वयाच्या 34 व्या वर्षी राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड
राजस्थानच्या राजकारणातील अनुभवी आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेलं व्यक्तिमत्व
इंदिरा गांधी, राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात गहलोत यांनी केंद्रीय मंत्री म्हणून 3 वेळा कार्यभार सांभाळलेला आहे.
1998 ते 2003 आणि 2008 ते 2013 या कालावधीत दोनदा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: