‘आश्रम’ वेब सीरिज वादाचा भोवऱ्यात

‘आश्रम’ या वेब सीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती पडली आहे. प्रकाश झा यांनी यापुर्वी ‘राजनिती’, ‘चक्रव्ह्यूह’, ‘आरक्षण’ यांसारखे काही वास्तववादी चित्रपटाचे दिग्दर्शक केले. आता चित्रपटांनंतर प्रकाश झा यांनी ‘आश्रम’ वेब सीरिजद्ववारे वेब विश्वात पदार्पण केलं. आता ही वेब सीरिज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

नोव्हेंबरमध्ये या सीरिजचा दुसरा भाग सुद्धा प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. शिवाय या वेब सीरिजने १०० कोटी व्ह्यूज मिळाल्याचा दावा प्रकाश झा यांनी केला आहे. दुसरा भाग प्रदर्शित होण्यापूर्वी पहिल्या भागाला ४० कोटी व्ह्यूज मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. शिवाय ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश झा म्हणाले, ही आश्रम ही वेब सीरिज थेट जनतेवर परिणाम करणारी आहे. चित्रपट किंवा सीरिज बनविल्यास, त्यावर टोकाच्या प्रतिक्रिया येणं हे अपेक्षितच असते. ‘आश्रम’ या वेब सीरिजला व्ह्यूज वाढतच गेले जेव्हा त्यांना हा आकडा १०० कोटीवर गेला आहे असं कळलं तेव्हा ते थक्क झाले असं त्यांनी मुलाखतीत सांगीतलं. प्रेक्षकांना अशा प्रकारचं कथानक पाहायला आवडतं असं समजल्याचं त्यांनी सांगितलं. आता ‘आश्रम’वेब सीरिजचा दुसरा भाग हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र ‘आश्रम’ वेब सीरिजचा दुसरा भाग हा वादाचा भोवऱ्यात अडकला आहे.

जोधपूर सत्र न्यायालयानं आश्रमचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली आहे. जोधपूरमधील काही सामाजिक संस्थांनी आश्रम सीरिजमधील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. शिवाय या सीरिजच्या माध्यमातून लोकांच्या धार्मिक आस्थावर तेढ निर्माण होत असल्याचा असा आरोप केला आहे.

Exit mobile version