एशियन गेम्स 2018: पी.व्ही.सिंधुंचा महिला एकेरी बॅडमिंटन अंतिम फेरीत प्रवेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

एशियन गेम्स 2018 महिला एकेरीच्या बॅडमिंटन अंतिम फेरीत पी. व्ही सिंधु प्रवेश करणारी पहिली भारतीय ठरली. तिने जपानच्या आकाने यामागुचीचा 21-17, 15-21,21-10 असा पराभव केला.

रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक, जागतिक स्पर्धेतील चार पदकं तिच्या नावावर असताना आता आणखी एका पदकाची भर पडली आहे. 

भारताच्या सायना नेहवालला सेमी फायनलमध्ये हार पत्करावी लागली असून तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. 36 वर्षांनी भारताला बँडमिंटनमध्ये वैयक्तिक मेडल मिळाले असून भारताचा एशियन गेम्समध्ये डंका कायम आहे.

सायना नेहवालच्या पराभवानंतर भारतीयांच्या नजरा पी. व्ही. सिंधूवर लागल्या आहेत. 

Exit mobile version