Thu. Sep 29th, 2022

‘बाळासाहेबांचा फोटो न लावता मते मागा’

शिवडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या नवीन शाखेच्या उद‌्घाटन समारंभात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. सुभाष देसाई, अनिल देसाई, अरविंद सावंत, सचिन अहिर, अजय चौधरी आदी यावेळी उपस्‍थित होते. म्‍हणाले, ‘‘भाजपला शिवसेना संपवायची आहे. शिवसेना आणि ठाकरे हे नाते संपवायचे आहे. मुंबईवरचा भगवा शिक्‍का पुसून स्‍वतःचा शिक्‍का उमटवायचा आहे; पण ते सोपे नाही. कारण आता हळूहळू सर्व चित्र स्‍पष्ट होते आहे. जे गेलेत त्‍यांच्यासोबत कोणी नाही, कारण त्‍यांना असामान्य बनविणारा शिवसैनिक आज आमच्यासोबतच आहे. आता पुन्हा सामान्यांतून असामान्य बनवायचे आहे. २७ तारखेला माझा वाढदिवस आहे. या दिवशी माझ्यासाठी पुष्‍पगुच्छ घेऊन येऊ नका, तर शपथपत्र आणि सदस्‍य नोंदणीचे गठ्ठे घेऊन,’’ या असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

‘‘जे गेलेत ते बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत. त्‍यांनी शिवसेनाप्रमुखांचा म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो न वापरता स्‍वतःच्या नावाने लोकांमध्ये जावे आणि मते मागावी. स्‍वतःच्या आई-वडिलांना सोबत घेऊन जावे. आता जे त्‍यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केले तेच तर मी अडीच वर्षांपुर्वी सांगत होतो. तेव्हा झाले असते तर सगळे सन्मानाने झाले असते. मात्र, जागा सत्ता सर्व समप्रमाणात वाटप ठरले असताना त्‍यांनी अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री हा शब्‍द फिरविला होता. तेव्हाच हे केले असते तर अडीच वर्षांसाठी भाजपच्या कोणाला तरी सत्‍तेचा शेंदूर बसला असता असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले. ‘समोरच्यांनी प्रोफेशनल एजन्सी नेमल्‍या आहेत. त्‍यांचा पैसा तर आपली निष्‍ठा अशी लढाई आहे. आदित्‍य महाराष्‍ट्रात फिरतोच आहे. मी देखील आता उतरणार आहे. लवकरच गणपतीबाप्पाचे आगमन होते आहे. गणपतीबाप्पा हे अरिष्ट लवकरच तोडून मोडून फेकून देईल आणि शिवसेनेचा भगवा केवळ महाराष्‍ट्रावरच नाही तर संपूर्ण देशावर फडकेल,’ असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्‍त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.