Jaimaharashtra news

आसामचा कल भाजपकडेच

देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. आसाम राज्यात भाजपला पुन्हा बहुमत मिळण्याची शक्यता आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत भाजप ८० जागांवर आघाडीवर होती. तसेच कॉंग्रेसला देखील ३५ पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र आहे.

आसाममध्ये ३ टप्प्यात मतदान पार पडले होते. राज्यात १२६ विधानसभेच्या जागा आहेत. भाजपने सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

२०१६ साली भाजपला १२६ पैकी ८६ जागांवर विजय मिळाला होता. आसाममध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. २०१६ साली कॉंग्रेसच्या २६ जागा निवडून आल्या होत्या.

 

Exit mobile version