Thu. Sep 29th, 2022

नाशिकमधील सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या

नाशिकमध्ये हत्येचे सत्र सुरु असताना नाशिकच्या सातपूर परिसरात भाजपाचे मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे. अमोल इघे हे सातपूर भाजप मंडळाचे अध्यक्ष होते. भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांचा मृतदेह सकाळी सातपूरच्या कार्बन नाका परिसरात आढळला. भाजप मंडळ अध्यक्षांच्या हत्येमुळे सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये चार दिवसातील अमोल इघे यांची तिसरी हत्या आहे. अमलो इघे यांचा मृतदेह आढळल्याक्षणी तेथे पोलीस दाखल झाले असून पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली.

राजकीय पदाधिकाऱ्यांच्या निर्घृणपणे हत्या करण्यात येत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला नाशकात आरपीआयच्या महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर किरकोळ वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार २४ नोव्हेंबर रोजी नाशकात उघडकीस आला होता. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. महिन्याभरात झालेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हत्येने नाशकात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.