Sat. Oct 24th, 2020

विदर्भात BSP च्या पारंपरिक मतदारसंघाला ‘वंचित’कडून खिंडार!

विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहे. मागच्या दोन दशकात बहुजन समाजवादी पक्षाने बऱ्यापैकी आपला जम बसवला होता, मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचा उदय झालाय आणि बसपाच्या पारंपरिक मतदारसंघाला खिंडार पडलंय. आता या विधानसभा निवडणुकीत परत बसपाला वंचित आघाडीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

विदर्भाच्या 62 जागांना अनन्यसाधारण महत्व आहे. गेल्या दोन दशकांत बहुजन समाजवादी पक्षाने बऱ्यापैकी आपला जम बसवला होता. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचा उदय झाला आणि बसपाच्या पारंपरिक मताला खिंडार पडलंय. त्याला काही अंशी बसपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे महाराष्ट्राकडे झालेले दुर्लक्ष व स्थानिक कुशल नेतृत्व कारणीभूत आहे.

विधानसभा निवडणूक – 2014 विदर्भ

एकूण विधानसभा – 62

द्वितीय क्रमांकावर राहिलेले बसपाचे उमेदवार – 4

तृतीय क्रमांकावर राहिलेले बसपाचे उमेदवार – 27

लोकसभेत विदर्भातील चार मतदार संघात काँग्रेस उमेदवार वंचितमुळे पराभूत झाले.

त्यामुळे या आधी भाजप विरोधी मतांचं ध्रुवीकरण जो बहुजन समाजवादी पक्ष करायचा आज त्या भूमिकेत वंचित आघाडी आलेली आहे. बहुजन समाजवादी पक्षापेक्षा वंचित आघाडी हा निर्णायक फॅक्टर ठरेल असं राजकीय जाणकारांना वाटतंय.

विदर्भवादी फॅक्टर

सध्यातरी जनमानसात वेगळ्या विदर्भाबाबत जनमत पाहायला मिळत नाही, त्यामुळे वंचित आघाडीचं सध्या तरी विदर्भात निर्णायक फॅक्टर दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *