Sun. Mar 7th, 2021

नितीश कुमारांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

नितीश कुमार यांची शेवटची निवडणूक…

जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी यंदाची बिहार विधानसभेची निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे, असे जाहीर केले आहे. नितीश कुमार तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. त्यांची शेवटची निवडणूक असल्याचं सांगत त्यांनी जनतेने जेडीयूला मतदान करण्याचे आवाहन केलं.यावेळी त्यांनी ‘अंत भला, तो सब भला’ असा डायलॉगही  मारला.

या घोषणेनंतर काँग्रेसकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. नितीश कुमार यांचं हे राजकीय विधान असू शकतं, ते आता मतांसाठी इमोशनल कार्ड खेळू पाहत आहेत. असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदम मोहन झा यांनी म्हटलं. नितीश कुमार यांना आपण या निवडणूक हरणार असल्याचं जाणवत असल्यामुळे त्यांनी अशी घोषणा केली आहे. नितीश कुमार यांना पुर्निया जिल्ह्यातील प्रचारादरम्यान  अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या आणि प्रचारादरम्यान त्यांना अनेक निषेध आंदोलनांना सामोर जावं लागलं होतं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *