Thu. Aug 5th, 2021

पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची शक्यता १० पटीनं वाढली ; वैज्ञानिकांच्या दाव्यानं खळबळ!

मुंबई : पृथ्वीवर मानवाच्या उत्पत्तीपूर्वी लघुग्रह आदळत होते. अनेकवेळा अंतळारातील लघुग्रह हे पृथ्वी ऐवजी गुरू या ग्रहावर आढळतात म्हणजे पृथ्वीला अनेक वेळा या अडचणीतून गुरू ग्रह बाहेर काढतो. कारण जर आज गुरू ग्रह अस्तित्वात नसता तर आज पृथ्वीवर राहण्यायोग्य अनुकुल वातावरण नसतं. पृथ्वीवर आजपर्यंत अनेक लघुग्रह आदळली आहे. तब्बल ६ कोटी ४० लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनासोरचं अस्तित्व संपुष्टात आलं होतं . तेव्हा Chicxulub लघुग्रहाच्या आदळण्यामुळे पृथ्वीवरुन डायनासोरचं अस्तित्व नाश पावलं होतं. याबद्दल आपल्याला कल्पना आहे. तब्बल १५० किमी रुंदीच्या या लघुग्रहाच्या आदळण्यामुळे मेस्किकोच्या खाडीजवळ जवळपास १० किमी लांबीचा खड्डा तयार झाला होता. यात काही लघुग्रह असेही आहेत की ज्यांच्यामुळे पृथ्वीभोवती राहण्यायोग्य अनुकुल वातावरण निर्माण झालं. पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याच्या घटना नेमक्या किती वेळा घडल्या आहेत याबद्दल सांगण हे फार कठीण आहे. मात्र सध्याच्या घडीला एक लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता ही जवळपास १० पटींनी वाढली आहे. साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार एका ठराविक कालावधीनंतर Chicxulub या लघुग्रहासारखाच एक लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आता १० पटींनी वाढली आहे. त्यामुळे अनेक संशोधकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. संशोधकांच्या माहितीनुसार, पृथ्वीवर पुन्हा एकदा एखादा लघुग्रह आदळला तर यामुळे फक्त नुकसान नव्हे, तर वातावरणातील ऑक्सिजनचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे मानव जातीचं जगणं कठीण होऊ शकते. दरम्यान, येत्या १०० वर्षांत पृथ्वीवर कोणताही लघुग्रह आदळण्याची शक्यता नाही, असंही काही संशोधकांनी म्हटलं आहे. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात दाखल होताच त्याचं तापमान वाढतं त्यामुळे त्याचे तुकडे होण्यास सुरुवात होते. त्यानंतर कधीकधी ते उल्कापिंड स्वरुपात पृथ्वीवर येऊन आदळतात. पण मोठ्या आकाराच्या उल्केमुळे पृथ्वीवर मोठं नुकसान होऊ शकतं. छोट्याछोट्या तुकड्यांमुळे इतकं नुकसान होत नाही. बहुतांश उल्का समुद्रात कोसळतात. कारण पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाण्याचं प्रमाण अधिक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *