कोजागरी पौर्णिमचं महत्त्वं

कोमल वावरकर, जय महाराष्ट्र, मुंबई : अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची शरद पौर्णिमा ही 30 ऑक्टोबर शुक्रवार रोजी म्हणजे आज आहे. स्नान करून यादिवशी दान आणि पूजा करावी लागते. यावेळी 2020 मध्ये अधिक मास आल्यानेे या पौर्णिमचे महत्त्व विशेष महत्त्व आहे तर अश्विन शुद्ध 14 कोजागरी पौर्णिमचेे महत्त्व शास्त्रानुसार अधिक मानलेे जाते.

16 कला असलेली शरद पूर्णिमा खूप खास आहे. कारण एकाच महिन्यात दोनदा पौर्णिमा येणं हा योग दुर्मिळ असते. म्हणून या अश्विनी कोजागरीचे पौर्णिमेचं महत्त्व अधिक आहे. पहिली पौर्णिमा ही 1 ऑक्टोबरला होती. धर्म, अध्यात्म आणि आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून शरद पूर्णिमा महत्त्वपूर्ण आहे कारण चंद्र किरण आपल्या शरीर आणि वातावरणासाठी फायदेशीर ठरते.

ज्योतिषाचार्य प्रल्हाद महाराज तळणीकर यांच्या मते, पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान, पूजा केल्याने लाभ होतो तर पौर्णिमा ही  30 ऑक्टोबर संध्याकाळी 5.45 वाजता सुरू होईल आणि ३१ ऑक्टोबरला  संध्याकाळी 8:18 मिनिटांनी समाप्त  होईल.

ज्योतिषाचार्य प्रल्हाद महाराज तळणीकर म्हणण्यानुसार शरद पूर्णिमावरील चंद्र किरण औषधी गुणधर्म असलेल्या अमृतसारखे आहेत. त्यामुळे खीरला चंद्र प्रकाशात ठेवली जाते. त्यानंतर खीरवर चंद्राचा प्रकाश पडल्यावर खीरला पहाटेच्या वेळी सेवन करतात. या खीरमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते तर यावेळी ब्लू मून सी असल्यानं चंद्राची चमक यावेळी जास्त असणार आहे. जेव्हा एका महिन्यात दोनदा पौर्णिमा येते त्यास ब्लू मून सी म्हणतात आणि यावेळी चंद्राचे किरण ही अधिक उजळ दिसणार आहे. शरद पूर्णिमेपासून देव दिवाळीसाठी दीपदान सुरू होणार आहे. 

Exit mobile version