Tue. May 18th, 2021

शशांक पाटील, मुंबई:- दाक्षिणात्य सिनेमा म्हटलंकी सर्वात आधी मनात येत ते म्हणजे अँक्शन. मात्र अलीकडेच असं नाही पण पूर्वीपासूनच दाक्षिणात्य सिनेमामध्ये अँक्शनपलीकडे बरंच काही असतं. मात्र आपल्याकडे मूळातच बहुतांशी अँक्शनपटच हिंदीत डब होत असल्यानं आपल्यालां हे बाकीचे सिनेमे माहित असणं कठीण आहे. तर अशाच काही अप्रतिम सिनेमांपैकी एक आहे ‘असूरन’. गोव्यात पार पडणाऱ्या ५१ व्या इफ्फी अर्थात इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये तामिळ भाषेतील हा सिनेमा दाखवणार असल्याच नुकतंच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहिर केलं.


तर पूनामी या तामिळ कांदबरीवर आधारीत हा सिनेमा भरपूर अँक्शन असून ही एक महत्त्वाची शिकवण देत अखेरपर्यंत कथेला अनुसरुन असा आहे. सिनेमाची कथा ही ‘असूरन‘ या नावातच दडलीये. आता असूरन म्हणजे असूर अर्थात राक्षस. तर असं नाव असणारां सिनेमा त्यात पोस्टरवर पण हिरोलाच असूरन म्हटल्यानं नक्की काय हिरोच व्हिलन आहेका? कि आणखी काय? असे अनेक प्रश्न पडतांत. हे सोडवण्यासाठी हा सिनेमा नक्की पाहायला हवा. सिनेमा 2019 च्या अखेर आँक्टोबरमध्ये रिलीज झाला असला, तरी त्याच्याबद्दल आपल्याइकडे किंवा समाजमाध्यमांवर जास्त काही हवा झाली नसल्यांन या सिनेमाबद्दल सामान्यांना कळणं कठीण. त्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी हा शॉर्ट रिव्ह्यूय वाचाच. तर सिनेमांच नाव असूरन हे धनुष या सिनेमाच्या मुख्य नायकासाठीच वापरण्यात आलंय. तर ही कथा एका सामान्य शेतकऱ्याची असून हा शेतकरी आपल्या कुंटूबांच्या रक्षणासाठी कसा राक्षस बनतो हे सांगणारी ही कथा 80 च्या दशकातील तामिळनाडूच्या एका खेड्यातील आहे. यातील हिरो धनुष हा आता अगदी हॉलीवुडपर्यंत पोहचल्याने त्याच्या अभिनयाची पोचपावती याआधीच त्याने दिली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल रिव्ह्यूय देण वेस्ट ऑफ टाईमच. तर सिनेमांत २५ वर्षापूर्वीचा अर्थात २५ वीचा धनुष आणि त्यानंतर ५० वर्षीय तीन मुलांचा बाप असणारा धनुष असे दोन्ही पात्र आपल्याला पाहायला मिळतात. तर धनुषसोबत इतर स्टारकास्ट ही दमदार आहे. हिरोईन म्हणून मंजू वँरियर हिने केलेली अँक्टिंग उत्तम आहे. तर धनुषच्या मोठ्या मुलाचे वेलमुरुगनचे पात्र साकारणारा तीजय अरुनासलम हा नट ही आपल्या सलामीच्या सिनेमांत अप्रतिम झळकलाय. त्यानंतर अगदी थोडासा रोल असणाऱ्या धनुषच्या वकीलाचे पात्र हे आपल्या लाडक्या जयंकात शिकरे अर्थात प्रकाश राज यांनी साकरलंय, अशी दमदार स्टारकास्ट असणाऱ्या चित्रपटाने आपल्या भारतीय समाजातील वर्णभेदाच्या राक्षसावर नेमकं बोट ठेवलंय.

तर या राक्षसाला जन्माला देण्यास कारण ही भारतीय समाजातील वर्णावर अवंलबून असणारी समाजव्यवस्था ठरली आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहून सर्वांनीच काहीतरी शिकणं गरजेच आहे. विशेष म्हणजे शेवटी धनुषने दिलेला संदेश लाखमोलाचा आहे. तो म्हणजे ”आपली जमीन, संपत्ती सर्वकाही मोठे लोक हडपू शकतात, मात्र आपण घेतलेले शिक्षण ते हिरावून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शिकूनच आपण या अन्यायाला रोखू शकतो.” तर हा शेवटचा डायलाँग एकताच आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या भारतरत्न डाँ. बाबासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी दिलेल्या ‘शिका संघटीत व्हा’ या उपदेशावरच या सिनेमाचा शेवट करत खरंच एक अप्रतिम कलाकृती दिग्दर्शक वेत्रिमारन यांनी असूरनच्या रुपात आपल्याला दिलीये. दरम्यान या सिनेमाची इफ्फीमध्ये निवड झाल्यानं आता हा सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणार असल्यानं ही खरंच भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *