Fri. Aug 12th, 2022

‘आता फडणवीस मौके पे चौका मारणार’ – नितेश राणे

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी फडणवीसांवर केला आहे. यावर संतंप्त भाजप नेत्यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे. आता भाजप आमदार नितेश राणेसुद्धा मैदानात उतरले आहेत. नितेश राणे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

  ‘नवाब मलिक यांनी हिट विकेट घालवली आहे. आता देवेंद्र फडणवीस हे ‘मौके पे चौका’ मारणार’, असे ट्विट करत नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे.

  नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांचे जयदीप राणा या ड्रग्ज पेडलसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचा जयदीप राणाशी काय संबंध? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला. तसेच फडणवीसांच्या इशाऱ्यावर ड्रग्जचा कारभार सुरू असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.