Tue. Sep 27th, 2022

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना किणी टोल नाक्यावर मारहाण

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि अन्य अधिकाऱ्यांना किणी टोल नाक्यावर शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. अमन मित्तल हे लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून कोल्हापूरला येत होते. सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.टोलनाक्यावरील विजय शेवडे आणि अन्य एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किणी टोल नाक्यावर सतत असे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे.

नेमकं काय घडलं?

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह अन्य अधिकारी कोल्हापरला येत होते.

लोकसभा निवडणुकीचे कामकाज आटोपून रात्री उशिरा मित्तल  निघाले होते.

किणी टोल नाक्याच्या कर्मचाऱ्याने गाडी अडवून टोल देण्याची मागणी केली.

ही शासनाची गाडी असून आम्ही सर्वजण शासकीय अधिकारी आहोत असे मित्तल यांनी सांगितले.

यावर त्यांच्याकडे आयकार्डची मागणी करण्यात आली.ते दाखवल्यास चालत नाही असे सांगण्यात आले.

टोल भरण्याचा आग्रह करत मित्तल यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आली.

या प्रकरणी टोलनाक्यावरील विजय शेवडे आणि अन्य एका कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.