Sat. Aug 17th, 2019

जगभरातील किमान 99 देशात झालेल्या सायबर हल्ल्यानंतर भारत सरकारने दिला सावधानतेचा इशारा

0Shares

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

जगभरातील किमान 99 देशात शुक्रवारी सायबर हल्ला झाला होता. भारताचाही यात समावेश होता.

 

आंध्र प्रदेश पोलिसांचे 102 कम्प्युटर्स सायबर हल्लेखोरांनी हॅक केले होते. पण याहीपेक्षा चिंतेची बाब आहे ती एटीएम मशिन्सची.

 

देशातील किमान 70 टक्के एटीएम मशिनमधील सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आलेले नाहीत. यामुळे हे एटीएम कधीही सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतात.

 

म्हणूनच रिझर्व्ह बँक, इतर बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या महत्त्वाच्या इतर वित्तीय संस्थांना केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे.

 

2014 पासून मायक्रोसॉफ्टने विंडोज XP साठी सुरक्षा आणि इतर सुविधा पुरवण्याचे बंद केले आहेत.

 

यामुळे हे एटीएम सहज सायबर हल्ल्याचे बळी ठरू शकतात अशी परिस्थिती आहे.

 

जगभरात शुक्रवारी झालेल्या सायबर हल्ल्यात आउटडेटेड सॉफ्टवेअर असलेले कम्प्युटर्सच सर्वाधिक हॅक झाले होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *