गेले एटीएम चोरी करायला आणि वाजला पोलीस सायरन अन्…

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून एटीएम फोडीच सत्र हे सुरूच आहे. गुरूवारी रात्री जेलरोड परिसरातील युनियन बँकेचे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री लुटण्याचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांच्या वाहनाचे सायरन वाजल्याने चोरटयांनी तिथून पळ काढला. एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला आहे. चोरट्यांचा सर्व कारनामा सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाला आहे.
यामध्ये चोरट्यांचा संपूर्ण एटीएमच घेऊन जाण्याचा प्रयत्न होता. गॅस कटरने खालचा भाग कट करून हे मशीन बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच सायरन वाजल्यामुळे पैसे न काढताच चोरटे पसार झाले.
विशेष म्हणजे शहरातील एटीएमची सुरक्षा ही ऐरणीवर आली आहे. कारण रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक नसतात. त्यामुळे चोरट्यांना चोरी करायला मिळते.
मात्र बँकांनी यासंदर्भात काळजी घेण्याची गरज आहे. या प्रकरणात नाशिकरोड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.