एटीएममध्ये पैसे भरणारी गाडी ड्रायव्हरने पळवली
मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे

विरार पश्चिमेकडील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी आलेली पैसे भरणारे वाहनच चक्क ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी घडली आहे. आनंद महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडिगार्ड उतरल्यावर हा प्रकार घडला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार ते सव्वा चार करोड रुपये हे गाडीत असून ती ड्रायव्हरने पळवल्याचे सांगितले आहे.