Sun. Jun 16th, 2019

…तर तुमचं एटीएम होणार बंद

0Shares

तुम्ही जर अजूनही जुने मॅगस्ट्राईप डेबिट म्हणजेच एटीएम किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला ते तातडीने बदलून घ्यावे लागणार आहे. 31 डिसेंबरला जुनी मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद होणार असून आरबीआयने ते ग्राहकांना बदलून घेण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच जुनी कार्ड बदलण्याची प्रक्रिया 31 डिसेंबरपूर्वीच करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. यानंतर मॅग्नेटिक स्ट्राइप असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात येतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 27 ऑगस्ट 2015 रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले होते.

सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांचे मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट आणि क्रेडिट कार्ड बदलून ‘EMV’ म्हणजेच युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा चिप बेस्ड कार्ड द्यावे, असे सांगण्यात आले होते. जर तुम्ही ईएमव्ही चिप बेस्ड कार्डसाठी अर्ज केला नसेल, तर 31 डिसेंबरपूर्वी करणे अनिवार्य आहे.

त्यामुळे जर मुदतीपूर्वी आपले जुने मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून घेतले नाही, तर ग्राहकांना त्यांचे एटीएम व्यवहार करता येणार नाहीत. ईएमव्ही बेस्ड कार्डसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमचे जुने मॅगस्ट्रीप डेबिट कार्ड बदलून घ्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *