Sun. Aug 18th, 2019

ATSची कारवाई, 9 संशयित दहशतवादी ताब्यात!

14Shares

महाराष्ट्रातील  दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) 17 वर्षीय किशोरवयीन मुलांसह इतर  9 जणांना अटक केली आहे. ‘इस्लामिक स्टेट’ या दहशवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून या तरूणांना मुंब्रा आणि औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आलं.

भारतीय दंड संहिता कलम 120 (बी)) , बेकायदेशीर  प्रतिबंध कायदा  आणि मुंबई पोलीस कायद्याच्या संबंधित तरतुदींखाली  या नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नऊ तरुणांना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमधून ताब्यात घेतलं आहे.

काय आढळून आलं या तरुणांकडे?

एटीएसने सोमवारी रात्री उशिरा आणि मंगळवारी सकाळी मुंब्रा आणि औरंगाबादमधील पाच वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला आहे.

योग्य चौकशीनंतर अधिकृतपणे त्यांना अटक करण्यात आली आहे.

या तरूणांकडे रासायनिक पावडर ,मोबाईल फोन, हार्ड ड्राईव्ह, सिम कार्ड्स, अॅसिड बाटल्या, आणि धारदार चाकू इत्यादी वस्तू सापडल्या आहेत.

ठाण्यामधील मुंब्रा शहरातील अमृत नगर, कौसा, मोती बाग आणि आलमस कॉलनी या भागात ATS ने शोधकार्य केलं.

औरंगाबादच्या कैसार कॉलनी, राहत कॉलनी आणि दमडी महल या ठिकाणीही ATSने तपास केला.

प्रजासत्ताक दिनाच्या 4 दिवस आधी ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

या तरुणांकडून काही आक्षेपार्ह इस्लामिक साहित्य हस्तगत करण्यात आल्याची माहिती ATSच्या सूत्रांनी दिली आहे.

गेल्याच महिन्यात NIA ने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 16 ठिकाणी छापे टाकले होते.

मुंब्रा आणि औरंगाबाद येथे करण्यात आलेली कारवाई देखील त्याचाच एक भाग आहे.

या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

14Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *