Mon. May 10th, 2021

काश्मीरमध्ये फुटीरतावादी शबीर शाहाची संपत्ती ईडीकडून जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्तीची कारवाई केली आहे. दहशतवादासाठी पैसा पुरविणे आणि हवाला प्रकरणी त्याच्याविरोधात खटला सुरू आहे.याच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली आहे.शाहच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन २५.८ लाख रुपये इतके करण्यात आले आहे.तर ही मालमत्ता त्याच्या पत्नीच्या आणि मुलींच्या नावावर आहे, अशी माहिती ‘ईडी’ने दिली आहे. शाह न्यायालयीन कोठडीत असून जैशचा सदस्य असलेल्या महंमद अस्लम वानी याच्या साथीने तो गैरकृत्य करत होता.

नेमका कोण आहे शबीर शाह?

काश्मीरमध्ये फुटीरतावादी आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांमध्ये शबीर शाहचे नाव आहे.

शाह न्यायालयीन कोठडीत असून जैशचा सदस्य असलेल्या महंमद अस्लम वानी याच्या साथीने तो गैरकृत्य करत होता.

‘शाह हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफिज सईद याच्या संपर्कात असल्याचे ही निष्पन्न  झालं आहे.

जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी कृत्ये करण्यासाठी शाह पैसा स्वीकारत असल्याचे आरोप आहेत.

हवाला मार्गातून पाकिस्तानातून आलेल्या पैशांचे वहन देखील तो करत होता आहे.

ईडीने जप्त केलेल्या शाहच्या मालमत्तेचे मुल्यांकन

शाहच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन 25.8 लाख असून  ही मालमत्ता त्याच्या पत्नीच्या आणि मुलींच्या नावावर आहे.

शाहच्या सासऱ्याने 1999 मध्ये खरेदी केली  असून 2005 मध्ये शाहच्या मेव्हण्याने  ती शाहच्या पत्नीच्या आणि मुलींच्या नावे केली.

आपण शाहला अनेक टप्प्यांत एकूण 2.5 कोटी रुपये पुरविल्याचे वानीने चौकशीत कबूल केले होते.

शाहच्या गैरहजेरीत त्याची पत्नी बिल्कीस शाह हिच्याकडे पैसा दिला असल्याचेही वाणी याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *