Tue. Mar 31st, 2020

अजुन एका राजकीय नेत्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर

राज्यात राजकीय नेत्यांवर हल्ला होण्याच्या घटना वारंवार होत आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच सांगलीतील राष्ट्रवादी नेत्यावर हल्ला करून त्याला जीवे मारण्यात आले. त्यांमागोमाग आता उत्तर भारतातही एका राजकीय नेत्यावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

उत्तर भारतातील शिवसेनेचे प्रमुख हनी महाजन यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लखोऱ्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये हनी महाजन यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते थो़डक्यात बचावले आहे. मात्र त्यांचा शेजारी असलेल्या अशोक कुमार यांच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.

संध्याकाळच्या सुमारास हनी महाजन हे डडवां रोडवरील आपल्या दुकानात बसलेले होते. संध्याकाळी 6.30 वाजल्याचा सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ येऊन गोळीबार केला.

या गोळीबारात हनी महाजन थोडक्यात बचावले. त्यांच्या पायाला गोळी लागल्यामुळे ते जखमी झाले. त्यांच्या शेजारीच उभे असलेले अशोक कुमार यांच्या डोक्यात गोळी लागली. गोळीबारानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले.

महाजन आणि अशोक कुमारला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. अशोक कुमार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हनी महाजन गंभीर जखमी असून त्यांना अमृतसर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरु केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक कसून तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *