Sun. May 16th, 2021

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना मारहाण

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना सासवड येथील झेंडेवाडीमधील एका कार्यक्रमात मारहाण झाली. पंडित मोडक आणि त्यांच्या 40 ते 45 कार्यकर्त्यांनी मिळून एकबोटेंना मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गोशाळेच्या कारभारावर होता आक्षेप!

पंडित मोडक यांची गोशाळा आहे.

मात्र ती चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आक्षेप मिलिंद एकबोटे यांनी घेतला होता.

यासंदर्भात तशी पोस्टही त्यांनी फेसबुकवर टाकली होती.

याच रागातून मिलिंद एकबोटे आणि आणखी 3 जणांना या गोशाळेचे प्रमुख पंडित मोडक आणि त्यांच्यासहित 40 ते 45 हल्लेखोरांनी मारहाण केली, दावा करण्यात आलाय.

या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद एकबोटे यांच्यावर भिमा- कोरेगाव दंगल भडकवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल आहे.

आत्तापर्यंत गोरक्षकांकडून गोमांसविक्री करणाऱ्यांना किंवा गोमांस खाल्ल्याच्या आरोपावरून मारहाण केल्याच्या घटना बऱ्याच घडल्या आहेत.

मात्र हिंदू आघाडीच्या कार्याध्यक्षांनाच गायीच्या संबंधित विषयावरून मारहाण होणं हे आश्चर्यकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *