Mon. Jul 22nd, 2019

Whatsapp वरून ‘ते’ फोटो केले डिलीट, Group admin ला बेदम मारहाण!

0Shares

Whatsapp वरील फोटोंसाठी लोक किती वेडे असतात, याची प्रचिती कोपरगाव येथील एका घटनेवरून आली आहे. Whatsapp वरील फोटो डिलीट केल्याबद्दल मित्रांनी एका तरूणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना कोपर गाव येथे घडली आहे. या हल्ल्यामध्ये फोटो डिलीट करणारा तरूण गंभीर जखमी झाला आहे.

का मारलं मित्रांनी group admin ला?

राहुल शिरसाट याच्या वाढदिवसाचे वाढदिवसाचे फोटो Whatsapp वर शेअर करण्यात आले होते.

10 मे रोजी ‘नितीन शेलार मित्र मंडळ’ या Whatsapp ग्रुपवर शेअर केलेले फोटो नितीन शेलार याने आपल्या ग्रुपवरून डिलीट केले.

नितीन शेलारच्या या गोष्टीचा राग आल्यान राहुल शिरसाट याने लोखंडी रॉडने नितीन शेलारवर हल्ला केला.

नितीन शेलारच्या पाठीवर आणि पायांवर वार करून त्याला जखमी केलं.

केवळ त्यानेच नव्हे, तर त्याच्या 13-14 मित्रांनीही 13  मे रोजी नितीन शेलारला बेदम मारहाण केली.

हल्ल्यानंतर उपचारासाठी नितीन शेलार याला श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे दाखल करण्यात आले आहे.

नितीन शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल शिरसाट याच्यासह आणखी 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: