Sun. Jun 13th, 2021

‘8 दिवसांत डॉक्टरांवर हल्ला होण्याइतकं काय घडलं?’ डॉ. अमोल कोल्हेंचा सवाल

कोरोनाचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरच हल्ले होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्यामुळे सर्वत्र अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. ‘आठ दिवसांपूर्वी आपण डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता दर्शवण्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या, थाळीनाद, घंटानाद केला होता. मग ८ दिवसांत असं काय घडलं की ज्यामुळे असं घडलं?’ असा सवाल त्यांनी केला.

कोरोनाचं जीवघेमं संकट देशावर असताना डॉक्टर जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावत आहेत. जर अशा लोकांवर आपण हल्ला करत असू, तर आपण जबाबदार नागरिक आहोत का, असा प्रश्न पडतो असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. कोरोनाग्रस्तांना वैद्यकीय उपचार पुरवण्यासाठी डॉक्टर स्वतःच्या परिवारापासून दूर राहत आहेत. रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना सहकार्य करायचं जर त्यांच्यावर हल्ले केले जाणार असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाहीत. आपलं देशप्रेम फक्त भारत-पाकिस्तान मॅचदरम्यानच उफाळून येतं, असं कोल्हे यांनी उद्वेगाने म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील डॉक्टरांवरील हल्ल्याबद्दल समज दिली आहे. डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवर हल्ले केल्यास कठोर कारवाई करू असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *