Mon. Jan 17th, 2022

नाशकात एसटी आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न

राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच कृती समितीच्या बैठकीतही विलीनीकरणावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये नोव्हेंबरपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. तर संप मागे घेण्याचे आवाहन करूनही कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान नाशकात एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाशिकमध्ये खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. आज ५० खाजगी चालक बस सेवेत दाखल झाले असून नाशकात सकाळपासून १० ते १२ लालपरी रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे.

नाशिकमध्ये खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटी बससेवा सुरू करण्यात आल्या. मात्र आंदोलक कर्मचाऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे. खाजगी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणताही अनुभव नसताना बस ताब्यात कशा दिल्या? असा सवाल संपकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

विलीनीकरणाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहेत. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत पुन्हा कामावर येण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *