Sat. May 15th, 2021

हरियाणात १३ शेतकऱ्यांवर हत्या, दंगल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्या आणि दंगल घडवून आणण्याचा प्रयत्नचा गुन्हा दाखल…

हरियाणा : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सध्या दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांच जोरदार आंदोलन सुरू आहे. मागील महिनाभरापासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर मुक्काम ठोकला आहे. अनेक वेळा शेतकरी संघटनेची आणि सरकारच्या बैठक झाल्या मात्र यातून कोणताही तोडगा निघला नाही. दिवसेंदिवस आंदोलनाची तीव्र होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांनी बुधवारी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी १३ शेतकऱ्यांवर हत्या आणि दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आणखी पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले आहे. कृषी विधयकावर सरकार आणि शेतकऱ्यांनी ताणातान सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *