Thu. Dec 2nd, 2021

‘जय भीम’ चित्रपटास प्रेक्षकांची पसंती; आयएमडीबी श्रेणीत अव्वल

  समाजातील सत्य परिस्थितीवर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. कोरोना काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला चांगली पंसती मिळाली. कोरोना काळात अनेक चित्रपटांचे प्रदर्शन ओटीटी प्लॅटफॉर्म करण्यात आले. अशातच तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या १९९५ सालामधील सत्य घटना प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. दिग्दर्शक ज्ञानवेल यांनी ही सत्य घटना जय भीम चित्रपटाच्या माध्यमातून ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सादर केली आहे.

  जय भीम या चित्रपटात तामिळ सुपरस्टार सूर्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. जय भीम चित्रपटात सूर्याची भूमिका पाहून चाहते थक्क झाल आहे. दमदार भूमिका साकारत सूर्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या सिनेमात १९९५मध्ये तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे घडलेल्या सत्य घटना दाखवण्यात आली आहे. एक विशिष्ट आदिवासी समुहावर जय भीम चित्रपट आधारलेला आहे.

  आयएमडीबीवर या सिनेमाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळाली आहे. अनेक चाहत्यांनी ट्विट करत जय भीम चित्रपटाचे कौतुक केले आहेत. तर बड्या कलाकारांनीसुद्धा चित्रपटावर प्रतिक्रिया देत पसंती दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *