बीडमध्ये पुतण्याकडून काकूवर बलात्कार

बीड जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्ह्यात २४ वर्षीय विवाहितेवर पुतण्याकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पुतण्याने अहमदनगर शहरात गुंगीचे औषध देत तर दुसऱ्याने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोघांच्या मदतीने बीडच्या काठवटवाडी फाट्यावर विवाहितेवर बलात्कार केला. पुतण्यानेच काकूवर बलात्कार केल्याची घटना बीडमध्ये घडल्यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात नराधम चुलत पुतण्या अजय गवते याच्यावर बलात्काराचा तर पप्पू नरहरी गवते, दत्ता गवते, परमेश्वर गवते सर्व रा. बेलुरा या तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.