Thu. May 13th, 2021

आता दर रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

रविवारी गाडी घेऊन कुठे लांब बाहेर फिरायला जात असाल. तर, मग शनिवारीच गाडीची टाकी फुल करुन घ्या.

 

कारण आता 14 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद असणार आहेत. तर, सोमवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेतच पेट्रोलपंप चालू राहणार आहेत असा इशारा पेट्रोलपंप

चालकांनी दिला.

 

तेल कंपन्यांनी बैठकीसाठी न बोलावल्यानं राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पंप चालवण्यासाठी आवश्यक खर्च किती असावा तसंच त्यांना दर सहा महिन्यांनी

महागाई निर्देशांकानुसार वाढ देण्याचे लेखी आदेश केंद्र सरकारने अपूर्वाचंद्रा कमिटीद्वारे तेल कंपन्यांना दिले होते.

 

मात्र, गेल्या चार वर्षांपासून त्याचं पालन करण्यात आलेलं नाही. अनेकदा पत्रव्यवहार करुनही तेल कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, असा आरोप पेट्रोलपंप चालक संघटनांनी

केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *