Tue. Jun 18th, 2019

औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तारांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

177Shares

निवडणुकांमध्ये एखाद्या उमेदवाराने माघार घेणं  निवडणुकीत  काही नवीन नाही. काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे अब्दुल सत्तार यांनी त्यांच्यावर कॉंग्रेसकडून होणाऱ्या अन्यायाला कंटाळून पक्षाचा त्याग केला होता. आता या मतदारसंघात    लढणाऱ्या अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दर्शवला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर कॉंग्रेसकडून झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.

कॉंग्रेसच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जाधवांना पाठिंबा

येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यामध्ये औरंगाबादमध्ये मतदान होणार आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबादचे अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेस पक्षातून काढता पाय घेतला होता.

त्यांच्यावर कॉंग्रेसने केलेला अन्याय हे पक्ष सोडण्याचे कारण सांगितले जात होते.

आता याच कारणासाठी अब्दुल सत्तार हे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा देत आहेत.

यासाठी सत्तार हे उद्यापासून हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचाराच्या तयारीला लागणार आहे.

यातून औरंगाबदमध्ये लोकसभेच्या निवडणुकांमुळे नवा इतिहास घडवला जाणार असल्याचे त्यांचे मत आहे.

कॉंग्रेसने नाकारलेल्या हर्षवर्धन जाधव हेच या भागातून निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

177Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *