Fri. Jan 21st, 2022

औरंगाबादच्या राज्य कृषी विभाग कार्यालयातून लाखो रुपयांचा घोटाळा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबादच्या राज्य कृषी विभाग कार्यालयातून लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

कृषी विभागाच्या आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक आणि कृषी अधीक्षक यांच्या बनावट सह्या करून हा घोटाळा करण्यात आला.

 

तब्बल 66 लाख 19 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी तत्कालीन वरिष्ठ लिपिक सुनील जाधव याला अटक केली.

 

या घोटाळ्यात कृषी विभागातील आणि बँकेतील वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे.

 

जून 2012 ते जून 2017 या कालावधीत आरोपी सुनिल जाधव हा लेखापाल, लिपिकपदी कार्यरत होता. नोव्हेंबर 2016 मध्ये त्याची बदली झाली.

 

त्याच्या जागेवर रुजू झालेले वरिष्ठ लिपिक के.जी. पाटील यांनी वारंवार मागणी करूनही आरोपीनं त्यांना दोन बँक अकाऊंटची माहिती मागितीली होती मात्र जाधव यांनी

दिली नाही. त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी बँकेकडून दोन्ही खात्याच्या स्टेटमेंटची माहिती घेतली. दरम्यान बँकेकडून मिळालेल्या स्टेटमेंटमध्ये आरोपीने एका खात्यात

बेकायदेशीर दहा लाख रुपये जमा केल्याचे आढळून आले.

 

तसेच पासबुकवरील नोंदी पाहून जाधवनं दोन्ही वेगवेगळ्या खात्यात 66 लाख 19 हजार रुपयांचा अपहार केल्याचं समोर आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *