Sat. Aug 15th, 2020

नवनिर्वाचित आयुक्तांचा पहिल्याच दिवशी दणका, अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई

औरंगाबाद : आस्तिककुमार पांडे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी अनेकांनी नवनिर्वाचित आयुक्तांचं अभिनंदन केले. यावेळी आयुक्तांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पाच हजारांचा दंड ठोठावला.

नक्की काय झालं ?

आस्तिककुमार पांडेंनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक महाजन देखील पुष्पगुच्छ घेऊन आले होते. या पुष्पगुच्छात प्लास्टिकचा वापर असल्याचं आयुक्तांच्या लक्षात आलं. यानंतर तात्काळच आयुक्तांनी पाच हजारांचा दंड ठोठावला.

अस्तिककुमार पांडेंची बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून औरंगाबादला आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला उभारी देणे हे मोठे आव्हान पांडे यांच्यासमोर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *