Tue. Dec 7th, 2021

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबाद: औरंगाबादमधील खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी कामगार उपायुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांचे कार्यकर्तेसुद्धा मोठ्या संख्येने कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याने जमावाचे चित्रीकरण केले.

जलील यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर मारला फटका

या प्रकरणात खासदार इम्तियाज जलील यांनी महिला पोलीस फातेम खान या कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारला. तसेच ‘मनोरंजनासाठी चित्रपट पाहायला आलो नाही, जमत नसेल तर बाहेर उभे राहा’, अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी पोळी कर्मचाऱ्यांना सुनावले. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.

या प्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५३ अंतर्गत शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा म्तियाज जलील यांच्यावर दाखल केला आहे. इम्तियाज जलील यांच्याकडून कोरोना काळात नियमांचे उल्लंघन झाले.

तसेच महिला पोलीस कर्मचारी फातेम खान यांनी जलील यांच्यावर हातावर मारल्याचा जबाब नोंदवला आहे. कामगार उपायुक्त यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *