Mon. Sep 20th, 2021

8 तासांच्या थरारनानंतर बिबट्या जेरबंद

औरंगाबाद : अखेर बिबट्याला 8 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर जेरबंद करण्यात यश आले आहे. वनविभागाच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले.  

महापालिकेचे कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे “ऑपरेशन बिबट्या” राबविल्यानंतर दुपारी दोन वाजता बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे.

सकाळी शहरातील एन 1 काळा मंदिर परिसरात बिबटयाचे दर्शन झाले होते. त्यामुळे मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. 

औरंगाबादमध्ये सकाळी सात वाजल्यापासून सुरु असलेल्या “ऑपरेशन बिबट्याला” पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *