Tue. May 18th, 2021

‘रोबोट’ करतोय बाप्पाची आरती !

 जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

आतापर्यंत तुम्ही हत्तीला गणरायाची आरती करताना पाहिले असेल, पण आजच्या मॉडर्न इंडियामध्ये रोबोटच्या हस्ते आरती केली जाते, असे

सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.

 

औरंगाबादमधील ‘टूल टेक टूलिंग्स’ कंपनीमध्ये गणेशाची आरती एका स्वयंचलित रोबोटद्वारे केली जातेय. 64 कुलांचे देवता असणाऱ्या

गणरायाची अशी आरती पाहून काळ किती पुढे गेला आणि भविष्यात रोबोट काय काय करू शकतो याची कल्पना येते. 

हाती पंचारती घेऊन गणरायाची आरती करणारा हा रोबोट गणेशभक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *