Fri. Aug 12th, 2022

औरंगाबादमधील एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

राज्यात विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी अद्यापही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे राज्यसरकारकडून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर काही कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली, त्यामुळे निलंबन सेवामसाप्तीच्या त्रासाला कंटाळून औरंगाबादमधील एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.

औरंगाबादमधील आधार क्रमांक १च्या २०१ एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी सेवा समाप्ती, निलंबन अशी कारवाई करत आहेत. त्यामुळे आम्हाला रोज मरण्यापेक्षा एकाच वेळी इच्छामरण द्या, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी केली आहे.

‘विलिनीकरण डोक्यातून काढून टाका’

नुकताच राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडले. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकारी कर्मचाऱ्यांच्या विलिणीकरणावर भाष्य केले. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण होईल हे कर्मचाऱ्यांनी डोक्यातू काढून टाकावे, असे सांगितले आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना १० तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.