Mon. May 10th, 2021

अबब ! झाडाला लागल्या साडे दहा लाख रुपयांच्या नोटा

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

झाडाला पैसे लागलेत का, असा प्रश्न आपण अनेकांना विचारला असेल किंवा आपल्याला कुणीतरी विचारलं असेल. तर, या प्रश्नाचं उत्तर आता हो असं द्यावं लागेल.

 

कारण, औरंगाबादच्या झाडाला फळं फुलं नव्हे, तर चक्क पैसे लागले आहे.

 

झाडाला लटकलेले हे पैसे पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. मात्र, त्यांना कुणीच हात लावला नाही. कारण त्या जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा होत्या.

 

एका अज्ञातानं झाडांवर जुन्या नोटांचं बंडल फेकले. त्यातल्या काही नोटा झाडांवरच लटकत होत्या.

 

या नोटा सुमारे साडेदहा लाखांच्या घरात असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या नोटा ताब्यात घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *