Tue. Sep 28th, 2021

IND VS AUS : ऑस्ट्रेलियाची भारतावर मात

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या विशाखापट्टणमच्या मैदानातील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ३ गडी राखून मात केली आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

भारताने ७ गडी गमावून केवळ १२६ धावांच आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होत.

ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकामुळे हे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलता आलं आहे.

सामन्यात भारताची खेळी

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

७ गडी गमावून केवळ १२६ धावा भारताला काढता आल्या.

३६ चेंडूंमध्ये के. एल. राहुलने शानदार अर्धशतकी खेळी केली.

धोनीने ३७ चेंडूंमध्ये २९ धावा पटकावल्या.

सामन्यात ऑस्ट्रेलियाची खेळी

नॅथन कल्टरने २६ धावा देऊन ३ बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने ४३ चेंडूंमध्ये सर्वाधिक ५६ धावा केल्या.

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ धावांची गरज होती.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आव्हान पूर्ण करत सामन्यात बाजी मारली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *