Thu. Jun 20th, 2019

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर 41 धावांनी मात

0Shares

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 41 धावांनी मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 307 धावांच आव्हान ठेवलं होतं. याचं पाठलाग करत असताना पाकिस्तानने 266 धावांपर्यंत मजल मारली आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत 6 गुणांसह 2 क्रमांक मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाचे पाकिस्तानसमोर 307 धावांच आव्हान

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शतक पुर्ण करत खेळाची चांगली सुरूवात केली आहे.

कर्णधार अरॉन फिंचने 82 धावांची खेळी करत वॉर्नरला चांगली सुरूवात केली आहे.

या दोघांनंतर कोणालाच मैदानात उत्तम कामगिरी दाखवता आली नाही.

पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने कांगारुंचे 5 खेळाडू बाद केले.

ऑस्ट्रेलियाने पहिली फलंदाजी करत असताना पाकिस्तान समोर 307 धावांचे आव्हान उभे केले होते.

पाकिस्तानची 266 धावांपर्यंत मजल

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 307  धावांच  पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २६६ धावांत संपुष्टात आला.

पाकिस्तानकडून सलामीवीर इमाम-उल-हक याने अर्धशतक ठोकलं. तर मोहम्मद हाफीजने ४६ धावा काढल्या.

अखेरच्या षटकात हसन अली याने 15 चेंडूत 32  धावा ठोकल्या. तर वहाब रियाझनंही 39  चेंडूत 45 धावा काढल्या.

रियाझनं 3 उत्तुंग षटकार आणि दोन चौकार ठोकले. कर्णधार सरफराज अहमद 40 अखेरपर्यंत खेळपट्टीवर उभा होता.

पाकिस्तानने 266 धावांपर्यंत मजल मारली आहे.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: