Thu. Aug 22nd, 2019

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांकडून भारताचे पंतप्रधान मोदींबद्दल Twitter वर गौरवोद्गार!

जपानमध्ये सुरू असलेल्या G-20 शिखर संमेलनात आज पंतप्रधान मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर केला. या फोटोला ‘मोदी किती चांगले आहेत’ असं कॅप्शन दिलं आहे.

0Shares

जपानमध्ये सुरू असलेल्या G-20 शिखर संमेलनात आज पंतप्रधान मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर केला. या फोटोला ‘मोदी किती चांगले आहेत’ असं कॅप्शन दिलं आहे.

‘मोदी किती चांगले आहेत’

जपानमधील ओसाकात जी-20 शिखर संमेलन सुरु आहे.

हे संमेलन 2 दिवस ओसाकामध्ये असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संमेलनात सहभाग घेतला आहे.

आज पंतप्रधान यांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांच्यासोबत बैठक झाली.

यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मजबूत संबंधांवर दोघांनीही चर्चा केली.

बैठकीनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

मोदींसोबतचा फोटो शेअर करताना त्यांनी “मोदी किती चांगले आहेत.”असं काही कॅप्शन दिलं आहे.

यामुळे सोशल मीडियात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केलं आहे.

 

या संमेलनात इतर BRICS नेत्यांसह देखील बैठक झाली. यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलचे राष्ट्रपतीही या बैठकीत हजर होते.

या बैठकीत मोदींनी BRICS नेत्यांना असे सांगितले की, “दहशतवाद फक्त निरागस लोकांचेच बळी घेत नाही, तर आर्थिक विकास आणि धार्मिक सद्भावनेलाही प्रभावित करतो.

आपल्याला दहशतवाद आणि वंशवादाचे समर्थन करणाऱ्यांना रोखले पाहिजे” यावेळी मोदींनी सौदी अरबचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान, कोरियाचे राष्ट्रपती आणि जर्मन चांसलर यांच्यासोबतही द्विपक्षीय चर्चा केली.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *